(माझ्या हरवलेल्या प्रेमाला अर्पण)
उमललेली मलूल रात्र आणि बहरलेली तू
निसटलेले निस्वार्थी प्रेम आणि शहरालेला मी
रात्र फुलायला लागते आणि तुझा चेहेरा दिसायला लागतो
न जाणताच मी मग स्वतःला दारूत बुडवत जातो
आठवणींच्या झरोक्यात मी मग स्वतःला नेतो
जणू रातराणीचा सुगंध बागेत दरवळायला लागतो
पौर्णिमेच्या त्या रात्री तू होतीस माझ्या सोबती
आमावस्येच्या ह्या प्रहरी तुझी आठवणच फक्त उरली आहे माझ्या भवती
शांत सागर किनारही मग उसळी घेतो
ज्या क्षणी तुझा विचार माझ्या मनात तरळतो
गर्दी मध्ये हरवून जातानाही मन एकटेच असते
तुझ्या वाटेकडे डोळे लावून एकटक पाहत बसते
काय झाले आपल्यात जे नको घडायला हवे होते
कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते तेथे सगळेच बिनसले होते
तू आणि फुलणारी रात्र सारेच कसे विरून गेले आहे
मनात आहे तो फक्त तुझा निरागस चेहेरा, बाकी आयुष्य संपले आहे
उमललेली मलूल रात्र आणि बहरलेली तू
निसटलेले निस्वार्थी प्रेम आणि शहरालेला मी
-----------------आनंद पेठे
Thursday, May 19, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
Good one
ReplyDeletekhup chaan! very touching
ReplyDeletemasta...well written
ReplyDeletehmmm nice...pan Daru kashala re ? :P
ReplyDeletetoo good sir!! Really liked it :)
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete