Friday, October 22, 2010

A special Letter of Appreciation

This is a letter sent by my friend Mr. Amol Mali after he completed reading 'just another LOVE STORY' . Regarding Amol, He is a senior research fellow in Food Division of UDCT pursuing his PhD. I dedicate this letter to all the Maharashtrians who know Marathi

प्रिय मित्र आनंद..

कसा आहेस..??? तुला एकदम आश्चर्य वाटेल एकदम असे मराठीतून मी का लिहितो आहे..?? अरे तुझे पुस्तक 'Just Another Love Story' आजच वाचून संपवले..एका फटक्यातच सलग वाचून काढले...'अप्रतिम' या शिवाय दुसरा शब्दच नाही..!!! काय कल्पनाविष्कार आहे यार तुझा..? त्याला खरंच काही तोड नाही..! सगळ्यात पहिली गोष्ट जी मला जाणवली ते तुम्ही वाचकाचा प्रवास वर्तमानातून सुरु करून भविष्यात घेऊन जातोस आणि परत अगदी योग्य वेळेस वर्तमानात त्यांना घेऊन येता..!!! यु.डी.सी.टी. तसेच दादर मध्ये असताना चे पण जे प्रसंग वर्णन तू केले आहेस ते पण मस्तच एकदम..सर्व जागा, ठिकाण, बस थांबा सर्व जे जे कुणी यु.डी.सी.टी.शी संबधित आहे...ते तो प्रसंग सहजपणे डोळ्यासमोर आणू शकतात आणी त्यातच खरी त्याची मजा आहे. वाचकांना तुम्ही त्यातच अगदी मंत्रमुग्ध करून टाकता. माझ्या बाबतीत पण अगदी असेच घडले, प्रत्येक प्रसंग अगदी त्या ठिकाणी तुम्हा दोघात काय झाले असेल हे चक्क मी visualise करत होतो. सर्व बाकीच्या जागा पण माझ्या एकदम ओळखीच्या आणि काही माझ्यासाठी पण एकदम खास आहेत..(ग्रीन्स, वरळी सी फेस, शिवाजी पार्क, इत्यादी). मला तू लिहिलेले quotes पण भारी आवडले..खास करून " 'It is very difficult to find a best friend in your husband....', 'Why we had gaps in our fingers...' and many more. सर्व प्रसंग आणि क्षण या सर्वांची एक मस्त सुरेख अशी गुंफण तुम्ही केली आहे, जी वाचकांच्या मनाला फार भावून जाते. वाचकांना तुम्ही किती आणि कुठपर्यंत तुमच्या कथेत गुंतून ठेवता यातच तुम्हा दोघांचे यश आहे आणि त्यात तुम्ही दोघे अगदी १०० % यशस्वी झाला आहात यात तिळमात्र शंका नाही..!!!
तुमच्या परवानगीने मला या पुस्तकावर आधारित अशी एक मराठी एकांकिका करायची इच्छा आहे. सध्या मी आय.एन.टी. मृगजळ, इ. एकांकिकेसाठी बाहेरून काम करत आहे, खास करून प्रत्येक नाटकाच्या संहितेवर..पुढ्या वर्षी कदाचित जर योग्य संधी मिळाली तर हि एकांकिका मी या स्पर्धेसाठी करू इच्छितो बघा तुम्ही विचार करून..तुमची परवानगी घेऊनच मी स्क्रिप्ट लिहायला सुरवात करेन..!!! मला खात्री आहे तुमची ही Love Story जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोचेल आणि तुम्ही देखील फक्त या Love Story पर्यंत मर्यादित न राहता आम्हा वाचकांसाठी साठी अजून काहीतरी घेऊन याल..!!! पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोघांना माझ्या मनापासून शुभेछ्या..!!!

आपलाच मित्र आणि पुस्तकप्रेमी
अमोल माळी

Needless to say, any type of creator loves a word of appreciation from another Creative person.

1 comment:

  1. Hi Anand, you are really great writer, I just came across your blog thrugh a frnd, thanks to him and so glad to know that we are from same Institute. This letter of appreciation is so much tempting me to get ur book now and start reading. Mala pan lihayla khup avadhte, but I am not great in writing as u are, I am doing it as my hobby and interest for now have started it thrugh blog, but later do have passion to write a small book. Thanks for being a inspiration.
    Cheers!!

    ReplyDelete